*भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नांदेड येथे आमदार बाबासाहेब पाटील उपोषणाला बसताच संबंधित अधिकारी झाला गायब..!* चाकुर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] November 07, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नांदेड येथे आमदार बाबासाहेब पाटील उपोषणाला बसताच संबंधित अधिकारी झाला गायब. .!* चाकुर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] आज नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालया समोर लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून पत्रव्यवहार करून सुद्धा बुजवण्यात येत नसून या सर्व गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे व या सर्व गोष्टीचा मनस्ताप चाकुर अहमदपुर विधानसभा मतदारसंघातील जनतेला सहन करावा लागत आहे या घटनेच्या निषेधार्थ आज चाकुर अहमदपुर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषण केले व जो पर्यंत येथे अधिकारी येऊन खड्डे बुजवण्या संदर्भात ठोस आश्वासन देत नाहीत तो पर्यंत मी व माझे सहकारी इथून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री.पाटील यांनी या ठिकाणी येऊन संबंधित गुत्तेदारशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला व जर येत्या सोमवार पर्यंत काम सुरू नाही झाले तर काम दुसऱ्याला देण्यात येईल अशी तंबी संबंधितला देण्यात आली व सोमवार पासून काम सुरू होईल अशी हमी कार्यकारी अभियंता यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या समोर घेतली. यावेळी शिवानंद हेंगणे,अर्जुन आगलावे,निवृत्तीराव कांबळे,माधवराव जाधव,प्रशांत भोसले,शाम देवकते,विठ्ठल चव्हाण,वसंत शेटकर,अझहर बागवान,दयानंद पाटील,किरण बारमले,गंगाधर ताडमे, इलियास सय्यद,सतिष नवटक्के, फिरोज शेख, मेजर, तानाजी राजे,संग्राम गायकवाड, आशिष तोगरे,संदीप शिंदे, बाळासाहेब बेडदे,व्यंकट वंगे, सचिन जाधव,लिंबाजी गंगापूरे,अनिल बेंबडे,अमित जाधव, धनराज पाटील,गणेश जाधव, बालाजी तिडोळे,सुदर्शन बेंबडे,शेख आयुब,शेख इझराइल सह आधी उपस्थित होते...