विलासराव देशमुख शासकीय आयुर्विज्ञान संस्थेसाठी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यागत मंडळ स्थापन आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील पंधरा सदस्यांची नियुक्ती लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय आयुर्विज्ञान संस्थेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिककार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यागत मंडळ गठीत करण्यात आले असून अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह एकूण १५ सदस्य या मंडळात असणार आहेत. वैद्यकीय महामंडळाचे कामकाजाचे व्यवस्थित नियमन व्हावे, रुग्णांना योग्य पध्द्तीने उपचार मिळावेत या उद्देशाने शासनाकडून सदरील अभ्यागत मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.या समितीचे अध्यक्ष जिल्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख राहणार असून, जिल्ह्यातील विधानसभा सदस्यातून आमदार बाबासाहेब पाटील, तसेच दिपाली राजीव कसबे (मागासवर्गीय महिला), मनिषा श्रीरंग कोकणे (महिला सामाजिक कार्यकर्त्या), बेंजामिन योहान दुप्ते (तज्ञ् प्रतिनिधी),ॲड. फारुक कासिमसाब शेख (सामाजिक कार्यकर्ते) डॉ.सचिन हनुमंतराव सगर (तज्ञ व्यक्ती) विशाल विठ्ठलराव विहारे, लक्ष्मण पिराजी कांबळे (सामाजिक कार्यकर्ता) आणि त्र्यंबक गुरुनाथ स्वामी (वर्तमानपत्राचा प्रतिनिधी) हे सदस्य राहतील. याशिवाय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, आरोग्य उपसंचालक, महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष, वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्मचारी प्रतिनिधी, वैद्यकीय महाविद्यालयातील एक विभाग प्रमुख हेही या समितीचे सदस्य राहणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणणे, मंजूर आर्थिक निधीचा योग्य नियोजन होते की नाही हे पहाणे, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, रुग्णाच्या तक्रारी या संदर्भात दखल घेऊन कामकाजात सुधारणा करण्यासाठी सदरील अभ्यागत मंडळ मदत करणार आहे.अभिनंदन विशाल
• संपादक:इरफान रहमान शेख