चापोली ते कपीलधार पदयात्रा प्राथमिक स्वरूपात मार्गस्थ* चाकुर ता.प्र[अतहर शेख]:--

*चापोली ते कपीलधार पदयात्रा प्राथमिक स्वरूपात मार्गस्थ*


 


चाकुर ता.प्र[अतहर शेख]:--


 


चापोली - गेल्या 66 वर्षांपासून चापोली ते कपिलधार पदयात्रा चा अखंडपणे सुरू होती. परंतु यावर्षी कोरोण्याच्या पार्श्वभूमीवर ही पदयात्रा कुठेतरी थांबणार असे चित्र असताना चापोली येथील भक्तांनी ही पदयात्रा काढण्याचा निश्चय केला आणि प्रातिनिधिक स्वरूपात पाच जणांच्या शिष्टमंडळासह ही पदयात्रा आज कपिलधार कडे मार्गस्थ झाली.. राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे आपल्या सर्वात नसल्या कारणाने राष्ट्रसंत परम पूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची संजीवन समाधी असलेल्या भक्ती स्थळाला काल जाऊन राष्ट्रसंतांची पूजा करून पदयात्रेत प्रारंभ करण्यात त्याला आज दुपारी चापोली येथे पदयात्रा आली आणि त्यानंतर तेथून पदयात्रा परंपरा प्रमाणे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना आदर्श मानून पदयात्रा मार्गस्थ झाली. ही पदयात्रा प्रातिनिधिक स्वरूपात असल्याकारणाने या पदयात्रेला मोठी स्वरूप नव्हते. ही पदयात्रा चाकूर, वडवळ जानवळ पानगाव अशा मार्गे कपिलधार येथे जाणार आहे व विशेष म्हणजे केवळ चापोलीच्या पदयात्रेला त्याठिकाणी मानाच्या शासकीय महापूजा सहभागी होण्याची परवानगी बीड चे जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली आहे. या पदयात्रेत दरम्यान कासनाळे परिवाराच्यावतीने पदयात्रेकरूना अन्नदान करण्यात आले. यावेळी आचार्य गुरुराज महाराज, परमपूज्य बालयोगी बालानंद महाराज, भगवान पाटील मन्मथ पालापूरे आदी उपस्थित होते.. कार्यक्रम चे सूत्रसंचालन गणेश स्वामी यांनी केले. पदयात्रेला पाठवण्यासाठी चापोली तील अनेक भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित झाले होते.... पद यात्रेकरुंना मास्क व सॅनिटायझर चे वाटप चापोली ते कपिलधार पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्व पदयात्री करूना माजी पंचायत समिती सदस्य निलेश मद्रेवार यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. उपस्थित सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत चापोली दिंडी प्रमुखांना मास्क व सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले.... कार्यक्रमासाठी येथील विविध युवक व ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला.....


Popular posts
मा.अविनाशदादा रेशमे यांचा सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार. निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद येथे मा.अविनाशदादा रेशमे यांची निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औराद सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. औराद जवळील प्रतेक गावात शिवसेना व युवासेना स्थापन करणार व पक्ष संघटन करुन औराद ग्रामपंचायततीवर भगवा झेंडा फडकाऊन सत्ता स्थापन करायची आहे असे मनोगत मा.अविनाशदादा रेशमे यानी व्यक्त केले .यावेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील,शंकर पोतदार,मगेश दावरगावे,सत्यनारायण पोतदार,राजकुमार अंबूलगे, पवन अंबूलगे, शिवसैनिक लखन बोंडगे,रंगराज म्हेत्रे,आकाश अंतरेड्डी ,प्रा आण्णासाहेब मिरगाळे ,प्रशांत वांजरवाडे, रवी नागरसोगे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थीत होते.
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Image