पक्षी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर वाण प्रकल्प परिसरात पक्ष्यांचे निरीक्षण परळी (शेख मुजीब)

पक्षी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर वाण प्रकल्प परिसरात पक्ष्यांचे निरीक्षण


परळी (शेख मुजीब)


पक्षी सप्ताह पार्श्वभूमीवर परळी शहरानजिक असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पावर पक्षी निरीक्षण कार्यक्रम पार पडला. देशी-विदेशी अशा विविध पक्ष्यांची ओळख करुन घेण्यासोबत पक्षीप्रेम वाढविण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. वन परिक्षेत्र परळीच्या वतीने पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने नागापूर येथील वाण प्रकल्प क्षेत्रात पक्ष्यांविषयी जनजागृती व आवड निर्माण करण्याच्या पार्श्वभुमीवर आज निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साधारणपणे 35 ते 40 पक्ष्यांची गणना व ओळख आज करण्यात आली. राखी, मोरहून, गुलाबी मैना, माऊमुनिया, पठाणी, सूर्यपक्षी, गरुड अशा प्रकारच्या पक्ष्यांची ओळख, गणना आज करण्यात आली. सकाळी 6 वा.पासून हा कार्यक्रम सुरु झाला. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी बी.एस.गित्ते, पक्षी मित्र हेमंत धानुरकर, सौ. तारका वानखेडे, वनपाल राठोड, वनरक्षक व्ही.एम.दौंड, पी.व्ही.सोळंके, अद्वेत गित्ते व भगवान शेप उपस्थित होते.


Popular posts
मा.अविनाशदादा रेशमे यांचा सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार. निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद येथे मा.अविनाशदादा रेशमे यांची निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औराद सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. औराद जवळील प्रतेक गावात शिवसेना व युवासेना स्थापन करणार व पक्ष संघटन करुन औराद ग्रामपंचायततीवर भगवा झेंडा फडकाऊन सत्ता स्थापन करायची आहे असे मनोगत मा.अविनाशदादा रेशमे यानी व्यक्त केले .यावेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील,शंकर पोतदार,मगेश दावरगावे,सत्यनारायण पोतदार,राजकुमार अंबूलगे, पवन अंबूलगे, शिवसैनिक लखन बोंडगे,रंगराज म्हेत्रे,आकाश अंतरेड्डी ,प्रा आण्णासाहेब मिरगाळे ,प्रशांत वांजरवाडे, रवी नागरसोगे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थीत होते.
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Image