*आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिले राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांना निवेदन...!* चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] November 05, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिले राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांना निवेदन... !* चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] सध्या अहमदपुर तालुक्यातील मन्याड,चाकुर तालुक्यातील शेळगाव व बोथी येथील कोल्हापुरी बंधार्याचे रुपांतर बॅरेजेस मध्ये करावे अशी मागणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडे बुधवारी (दि.4) केली.अहमदपुर तालुक्यातील मन्याड नदिवर चिखला,रुध्दा,सेनकुड,मावलगाव,पाटोदा तसेच चाकुर तालुक्यातील शेळगाव व बोथी येथे कोल्हापुरी बंधारे आहेत. बंधार्याच्या दरवाज्यातून पाणी गळती होत आहे. परिणामी बंधार्यात पाणी राहत नाही. शेतकर्याना शेतीला पाणी मिळत नसल्याने कोल्हापुरी बंधार्याचे रुपांतर मांजरा नदीच्या धर्तीवर बॅरेजेसमध्ये करावे. अशी मागणी अहमदपुर-चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील यांच्या कडे निवेदनाव्दारे केली.. यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, तसेच सिद्धी शुगर चे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाटील होते....