<no title>अहमदपुर येथे शेर-ए-शहिद टिपू सुलतान यांच्या 271व्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप..* चाकूर ता.प्र.[अतहर शेख] November 30, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *अहमदपुर येथे शेर-ए-शहिद टिपू सुलतान यांच्या 271व्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप..* चाकूर ता.प्र.[अतहर शेख] अहमदपूर येथे शहिद टिपू सुलतान यांच्या 271व्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला ऑल इंडिया तहेरिक-ए-खुदादद संघटना यांच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात पण यावेळी सगळी कडे कोरोणाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करुनच सगळी कडे जयंती साजरी करण्यात आली त्यामुळे तहेरिक-ए-खुदादद संघटना यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमा मध्ये मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत फळ वाटप करण्यात आले या काय॔क्रमाचे अध्यक्ष मा.सय्यद इलियास भाई युवा नेते (अहमदपुर) यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेख अय्याज युवा नेते, पारघी सिस्टर. शेख मतीन राठोड सिस्टर. चव्हाण मामा. बसवेश्वर लोहारे.शेख मतीन.शेख युनूस.शेख अकबर.अजिंक्य गायकवाड.सय्यद अझहर. शेख अखिल व आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मा.तबरेज अली सय्यद यांनी केले होते...