शेरे-ए- शहिद टिपु सुलतान यांची जयंती चाकुर शहरात साजरी..* चाकुर ता.प्र.[अतहर शेख]:- November 29, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *शेरे-ए- शहिद टिपु सुलतान यांची जयंती चाकुर शहरात साजरी..* चाकुर ता.प्र.[अतहर शेख]:- शहिद हजरत टिपु सुलतान यांची 271 वी जयंती चाकुर शहरामध्ये साजरी करण्यात आली.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाच्या निर्देशांप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली.टिपु सुलतान चौकांमध्ये झेंडावंदन व अभिवादन करुन जंयती साजरी झाली.प्रत्येक वर्षी भव्य मोटार सायकल रैली व अमन रैली काढण्यात येत होती.पण यवर्षी कोरोनामुळे रैली काढण्यात आली नाही.मर्यादित लोकांच्या उपस्थित मध्ये झेंडावंदन व आभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली. शेरे -ए- हिंद शहीद हजरत टिपु सुलतान यांच्या जयंती साजरी दि.29/11/2020 रविवारी सकाळी 10 -00 वाजता चाकुर नगरीचे माजी उपसरपंच सय्यद मुर्तुजाअली यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले. टिपु सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन रामकिशन सिरसाठ मामा यांनी अभिवादन केले. कार्यक्रमास शेख पप्पुभाई,शेख इलियास सर,सलीमभाई तांबोळी,सय्यद निहाल,बिलाल पठाण,मतीन मौलाना,शेख ताहेरदादा, उस्मान शेख सर, बालाजी व्होटे,अझहर सौदागर,वाजीद शेख,तौफीख शेख,तय्यब शेख,इक्रामोदीन कमाल,सुधीर हंणमते,श्रीनिवास गायकवाड ,सुनिल शिंदे,आदि असंख्य समाज बांधव उपस्थित होते.